या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी शास्त्रोक्त श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे ही आपल्या प्रत्येकाची कर्तव्यभावना आहे. श्राद्ध केल्याने पितरांचे आशीर्वाद लाभतात, घरातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबात शांतता, आरोग्य व समृद्धी येते.
ब्रह्मतेज मध्ये आम्ही आपल्यासाठी वैयक्तिक श्राद्ध विधीची सोय उपलब्ध करून देत आहोत. आपल्या घरी किंवा इच्छित ठिकाणी आमचे अनुभवी व शास्त्र जाणणारे गुरुजी श्राद्ध विधी करून देतील. पितृ तर्पण, पिंडदान, ब्राह्मण भोजन तसेच शांतीपाठ हे सर्व विधी पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने केले जातील.
सर्व पूजा साहित्याची पूर्ण व्यवस्था आमच्याकडून केली जाईल, त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. प्रत्येक विधी काळजीपूर्वक, शुद्धतेने आणि परंपरेनुसार पार पाडला जाईल.
सध्या पितृपक्ष जवळ आल्यामुळे बुकिंग जलदगतीने सुरू आहे. जर आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध शास्त्रानुसार करायचे ठरवत असाल, तर आजच आपली अॅडव्हान्स बुकिंग करून ठेवा.
सेवा उपलब्ध: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण–डोंबिवली व परिसर
Comments are closed